बोगस मतदार कमी न केल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार

कराड – मलकापूर नगरपरिषदेची 2018 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून 31 ऑक्‍टोंबर 2018 अखेर मलकापूर शहरातील 160 ते 177 या यादीभागामध्ये नव्याने नोंदणी केलेल्या मतदारांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींनी आपल्या राजकिय फायद्यासाठी परजिल्ह्यातील तसेच इतर तालुक्‍यातील तसेच दुसऱ्या राज्यातील मतदारांची नोंदणी केल्याचे दिसून येत आहे. तरी सदरच्या याद्यांचे शुध्दीकरण करावे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा मनसेचे तालुका अध्यक्ष दादा शिंगण यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, फक्त निवडणूक फायद्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आजूबाजूच्या गावातील नागरिकांची मतदान नोंदणी केलेली आहे, ही बाब गंभीर असून लोकशाहीच्या दृष्टीने मारक आहे. त्यामुळे या गोष्टींचा गांभिर्याने विचार व्हावा. तसेच मलकापूर नगरपरिषद निवडणूकीमध्ये शहरातील इतर यादी भागातील मतदार सोयीनुसार आपआपल्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे प्रयत्न काही राजकिय मंडळी करतील, यामुळे प्रभाग याद्या बनवताना शहरातील संबंधित मतदार नोंदणी अधिकारी यांना तसेच बी. एल. ओ. यांना योग्य त्या सूचना देवून यद्या बनवाव्यात.

तसेच जे मतदार या शहरामध्ये वास्तव्यास नसतील, त्यांची नावे सुधारित यांद्यामधून कमी करुन याद्या शुध्दीकरण कराव्यात. याबाबत योग्य ती कार्यवाही न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)