बोगस पीएच.डी.प्रकरणी कुलगुरूसह पाचजणांवर गुन्हा

स्पायसर युनिवर्सिटी ः गुन्हे शाखेकडे तपास सोपविला

पुणे- आपापसात संगनमत करून बनावट पीएच.डी. डिग्री प्राप्त करून, तिचा वापर करून औंध परिसरातील स्पायसर ऍडवेंटीस्ट युनिवर्सिटीमध्ये पदोन्नती आणि अर्थिक फायदे घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी कुलगुरूसह पाचजणांवर चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विद्येच्या माहेरघरीच हा प्रकार उघडकीस आल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

याबाबत ऍलन अलमेडिया (वय 53, रा. सॅलिसबरी पार्क) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार स्पायसर ऍडव्हेंटीस्ट युनिव्हर्सिटीचे उप कुलगुरू प्रसाद पिल्ले, चीफ फायनान्सीयल ऑफिसर रत्नस्वामी जयेम, हेड ऑफ द डिपार्टमेंट आर्टस चाको पॉल, कात्रज येथील क्रिएटीव्ह एज्युकेशन फाउंडेशनचे संचालक हिंदुस्थान कॉलेज ऑफ मॅनेजमेंट ऍन्ड रिसर्च) गोपाल भिकाजी खंदारे आणि अन्य एक जणांवर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका चर्चचे सदस्य आहेत. त्यामाध्यमातनू ते मागील 40 वर्षापासून सामाजिक कार्य करत आहेत. त्यांनी 27 सप्टेंबर 2017 ते 4 सप्टेंबर-ऑक्‍टोबर 2017 रोजी माहिती अधिकार कायद्याअन्वये स्पायसर युनिव्हर्सिटीकडे पीएच.डी. बाबत माहिती मागितली होती. मात्र, त्यांना सदरची माहिती देण्यात आली नव्हती. त्यामुळे फिर्यादींनी 5 जानेवारी 2018 रोजी पुन्हा पत्र व्यवहार करून संबंधितांच्या पीएच.डी.ची माहिती मिळण्यासाठी अर्ज केला. स्पायसर युनिव्हर्सिटीने संस्था खासगी असल्याचे कारण देऊन 9 फेब्रुवारी 2018 रोजी फिर्यादींनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे आरोपींच्या पीएच.डी.च्या पदव्या या बनावट असल्याचा संशय बळावल्याने फिर्यादींनी पोलिसांकडे अर्ज केला आहे. अर्जाच्या तपासानंतर आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस आयुक्‍तांच्या देखरेखीखाली तपास
विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात बनावट पीएच.डी. प्रकार उघडकीस आला आहे. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊन, चतु:श्रृंगी पोलिसांनी गुन्हे शाखेकडे तपास वर्ग केला आहे. त्यामुळे पोलीस आयुक्‍त रश्‍मी शुक्‍ला, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-1 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले-पाटील तपास करीत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)