बोगस कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्यांना पायबंद

प्रवेशाची पळताडणी ऑनलाइन होणार

पुणे – वैद्यकीय आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी आता ऑनलाईनद्वारे करण्याचा निर्णय राज्य सीईटी सेलने घेतला आहे. त्यानुसार प्रत्यक्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे कागदपत्राची तपासणी प्रगतीपथावर आहे. त्यामुळे बोगस कागदपत्र व दाखलाचा आधार घेऊन प्रवेश घेणाऱ्या प्रवृत्तीला पायबंद बसणार असल्याचे स्पष्ट होत आहे.

राज्य सीईटी सेलचे आयुक्‍त तथा प्रवेश नियामक प्राधिकरणाचे सचिव आनंद रायते यांनी याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. सीईटी सेलच्या अंतर्गत तंत्रशिक्षण संचालनालय, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय, कला संचालनालय, आयुष संचालनालय, उच्चशिक्षण संचालनालयाच्या अखत्यारित येणाऱ्या अभ्यासक्रमांसोबतच कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक कागदपत्रे आणि दाखल्याची पडताळणी ऑनलाईनद्वारे केली जात आहे. पडताळणीचे कामकाज संगणकीकृत “सफलता’ या पोर्टलद्वारे करण्यात येत आहे.

यापूर्वी संबंधित विभागामार्फत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी केली जात होती. आता संबंधित संस्थेला विद्यार्थ्यांची सर्व माहिती व कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करावी लागणार आहे. त्यानंतर संगणकीकृत तपासणीची प्रक्रिया सुरू होईल. गतवर्षी पुणे विभागात 6 विद्यार्थ्यांनी बोगस जात वैधता प्रमाणपत्र सादर करून प्रवेश घेतल्याचे आढळून आले. आता ऑनलाईन प्रक्रियेतून आणखी पारदर्शकता येणार असल्याचे स्पष्ट होत आहे. एखाद्या विद्यार्थ्याने प्रवेश प्रक्रियेत सहभागी होताना आणि प्रत्यक्ष प्रवेश करताना कागदपत्रे-दाखले वेगळे दिल्यास त्याची माहिती समजणार आहे.

दरम्यान, प्रवेशाची पडताळणी ऑनलाईनद्वारे करण्याची कार्यवाही सुरू आहे. दि. 1 डिसेंबरपासून सर्व महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांच्या उपलब्ध कागदपत्रांची प्रत्यक्ष छाननी ऑनलाईनद्वारे करण्यात येणार आहे. तपासणी दरम्यान विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भात त्रुटी आढळल्यास, संस्थंने त्याची त्वरित पूर्तता करावी, अशा सक्‍त सूचना रायते यांनी सर्व संस्थांना दिल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)