बोगस कंपनीच्या नावे लुटली लाखोंची बिलेः आंदोलनाचा इशारा

Electricity

अकलूज – महावितरण कंपनीच्या अकलूज विभागीय कार्यालयात मागील काही वर्षांपासून अनधिकृत आणि बेकायदेशीर कंपनीच्या नावे लाखोंची बिले उचलण्यात आली असून, दोषी असणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सध्या जोर धरत आहे. या प्रकरणी योग्य पावले उचलली गेली नाहीत तर मंगळवार (दि. 22) पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा भ्रष्टाचार निर्मूलन जनसंघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष बाबासाहेब शेंडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अकलूज येथील महावितरण कंपनीमध्ये आऊट सोर्सिंगवर (कॉन्ट्रॅक्‍ट बेसवर कामगार) ज्या कंपनीने कामे केली आहेत, त्या कंपनीने आपले रजिस्ट्रेशन कार्यालयाकडे सादर करणे बंधनकारक आहे, तसेच कामगार यादी, राज्य कामगार विमा आणि पीएफ यादी या सर्व बाबी विचारात घेऊन कार्यकारी अभियंत्यांनी या कंपनीला कॉन्ट्रेक्‍ट बेसवर कामगार पुरविण्याचे करार करणे बंधनकारक होते; परंतु सदर कंपन्या या बोगस असून कुठल्याही प्रकारचे रजिस्ट्रेशन केलेले नसल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबीमध्ये कार्यकारी अभियंता, अकलूज यांचाच सहभाग असल्याने त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग, कामगारांच्या भवितव्याचा विचार न करता केलेला करार कारवाईस पात्र असून , त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. याचबरोबर अकलूज विभागांतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांच्या बदल्या शासन परिपत्रकाप्रमाणे होणे गरजेचे असताना देखील कार्यकारी अभियंत्यांनी या बदल्या केलेल्या दिसत नाहीत.त्यामुळे य ाप्रकरणीही कार्यकारी अभियंत्यावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आलेली आहे.
या भ्रष्टाचार प्रकरणी वरिष्ठ पातळीवरून त्रिस्तरीय समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने आपला अहवाल मुदतीत सादर केला आणि दोषींवर योग्य ती कारवाई करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता अकलूज यांना देण्यात आले होते.तरीही अद्याप कारवाई झालेली नाही. या प्रकरणी 2 मे 2017 रोजी बारामती येथील परिमंडल कार्यालयासमोर उपोषण करून देखील अद्याप कारवाई केली नसल्याने, मंगळवारी (दि. 22) पासून आमरण उपोषण करण्याचा इशारा शेंडगे यांनी दिला आहे.

  • “शिवरत्न’च्या नावाखाली सावळा गोंधळ
    शिवरत्न म्हणजे मोहिते पाटील हे समीकरण आहे. मात्र, या भ्रष्टाचारात शिवरत्नचे नाव वापरून लाखो रुपयांची बिले काढण्यात आली आहेत. मुळात कंपनीच बेकायदेशीर स्थापन करून मोहिते पाटील यांच्या नावाचा गैरवापर करून आर्थिक लूट करण्यात आली असल्याचे बोलले जात असून, कुणी ही कंपनी स्थापन केली त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)