वाहतूक एका बाजूने वळवली

सातारा प्रतिनिधी
सातारा आणि परळी खोऱ्याचा वाहतुकीचे माध्यम असणाऱ्या ब्रिटिशकालीन बोगदा परिसरातील डोंगरालगतच्या मातीचा भराव संततधार पावसाने कोसळल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते . सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ बोगद्याच्या डाव्या कोपऱ्यावर बॅरिकेटिंग करून वाहतूक एका बाजूने वळवली . या बोगद्याचे तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिट करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे .
शेंद्रे सोनगाव सज्जनगड तसेच परळी खोऱ्यातील गावांना जाण्यासाठी हा बोगदा हा अत्यंत जवळचा मार्ग आहे . ब्रिटिशकालीन बोगद्याला वाहतुकीची शतकी परंपरा आहे . या बोगद्याच्या डोळ्यावर जुन्या पॉवर हाऊसची काही वस्ती असून येथूनच यवतेश्वरच्या घाटाला आरंभ होतो . हा भाग डोंगरकड्याचा असून येथे वस्ती आहे . गुरूवारी सकाळी पावणेदहाच्या दरम्यान बोगद्याच्या उजव्या बाजूने मातीचा भराव संततधार पावसामुळे सटकत असल्याचे काही सतर्क नागरिकांच्या लक्षात आले . या रस्त्यावरील वाहतूक तत्काळ थांबवण्यात आली . सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ बॅरिगेटिंग करून उपाययोजना केल्या . तसेच परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे . या भागातील रहिवांशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून यंत्रणा परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)