बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांकडून 8 जणांची हत्या

कानो (नायजेरिया) – नायजेरियातील मोदु अजिरी आणि बुलामा कायिरी गावात बोको हराम संघटनेच्या दहशतवाद्यांनी तेथील गावकऱ्यांवर हल्ला करून आठ जणांना ठार मारल्याची बाब उघड झाली आहे. हे दहशतवादी त्या गावातील पशुधन पळवण्यासाठी आले होते पण गावकऱ्यांनी संघटीतपणे त्याला विरोध केल्यानंतर दहशतवाद्यांनी त्यांच्यावर शस्त्रे चालवली. त्यात आठ जण जागीच ठार झाले तर अन्य अनेक जण जखमी झाले.

ज्या भागात हा प्रकार घडला तो भाग राजधानी मैदुगुरीपासून 90 किमी अंतरावर आहे. दहशतवाद्यांकडे बंदुका होत्या तर गावऱ्यांनी मात्र पारंपारीक धनुष्यबाणाने त्यांचा प्रतिक्रार केला. त्यांच्याकडे तलवारीही होत्या पण त्याचा काही फार उपयोग होऊ शकला नाही. त्यामुळे गावकऱ्यांवर वर्चस्व मिळवून हे दहशतवादी त्यांचे पशुधन घेऊन पळून गेले.

बोको हराम ही इस्लामिक कट्टरपंथीयांची संघटना असून त्यांच्या हिंसाचारामुळे या भागातील सुमारे दहा लाख लोकांनी तेथून पलायन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)