बोंड अळी व तुडतुड्या रोगाच्या नुकसानीसाठी केंद्राकडे 3 हजार कोटींचा प्रस्ताव

मुंबई – बोंड अळी व धान पिकावरील तुडतुड्या रोगाच्या प्रादुर्भावामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राष्ट्रीय आपत्ती पुवर्नवसन निधीच्या (एनडीआरएफ) दरानुसार मदत देण्याकरीता 3 हजार 373 कोटी रुपयांच्या मदतीचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठविणार आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पंचनाम्यानुसार 33 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदतीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज विधानसभेत दिली.

विधानसभेत एका निवेदनाद्वारे चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, खरीप 2017 च्या हंगामातील कापूस पिकावरील बोंड अळी व धान पिकावरील तुडतुडे रोगाच्या प्रादुर्भावामुळे बाधित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री पिक विमा योजनेखाली पीक कापणी प्रयोगानुसार 33 टक्के पेक्षा अधिक नुकसान झाल्यास एनडीआरएफच्या दरानुसार व निकषानुसार मदत देण्याचा निर्णय 23 फेब्रुवारी 2018 च्या शासन निर्णयानुसार घेण्यात आला होता.

यासंदर्भात लोकप्रतिनिधींच्या भावना विचारात घेऊन हा शासन निर्णय रद्द करण्यात आला आहे. आता क्षेत्रिय अधिकाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यानुसार 33 टक्केपेक्षा अधिक नुकसान आढळून आलेल्या प्रकरणी बाधीत शेतकऱ्यांना एनडीआरएफच्या दरानुसार मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी 17 मार्च 2018 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)