‘बोंडारवाडी’धरण प्रकल्पासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे गरजले

धरणासह लावंघर उपसा सिंचन योजना, उरमोडी कालव्यांची कामांच्या पूर्ततेची मागणी

सातारा – जावली तालुक्‍यातील महत्वकांक्षी आणि बहुचर्चित बोंडारवाडी धरण प्रकल्पाला तत्काळ मंजुरी देवून धरणाच्या कामासाठी निधी मंजूर करावा, या प्रमुख मागणीसह सातारा तालुक्‍यातील लावंघर उपसा सिंचन योजनेचे काम मार्गी लावा आणि उरमोडी धरण प्रकल्पाच्या सातारा तालुक्‍यातील कालव्यांची कामे तातडीने पूर्ण करा, या तीन मागण्यांसाठी सातारा-जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज राज्य सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेत शड्डू ठोकला.

या मागण्यांकडे लक्षवेधण्यासाठी शिवेंद्रसिंहराजेंनी लक्षवेधी वेशभुषा करूब विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर अनोखे आंदोलन केले. दरम्यान, सरकारने मागण्या तातडीने मान्य कराव्यात अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणातील पाणी खाली जावू देणार नाही, असा इशाराही आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला.

बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे आवश्‍यक आहे. यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे यांचा शासनदरबारी पाठपुरावा सुरु आहे. तसेच लावंघर व परळी भागातील पाणीटंचाईची समस्या सोडवण्यासाठी उरमोडी पाटबंधारे प्रकल्पांतर्गत लावंघर उपसा सिंचन योजना तयार करण्यात आलेली आहे. या योजनेचे काम सुरु करण्यासाठी आणि उरमोडी धरणातून सातारा तालुक्‍यात सिंचनासाठी सुरु असलेली कालव्यांची कामे पूर्ण व्हावीत, यासाठीही पाठपुरावा करत आहेत.

या प्रल्पांच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी त्यांनी मुंबईत विधानभवनाच्या समोर ठिय्या आंदोलन केले.
बोंडारवाडी धरणाला मंजूरी मिळालीच पाहिजे, या सह विविध मागण्यांचा मजकूर असलेला पोषाख आणि गांधी टोपी परिधान करुन आ. शिवेंद्रसिंहराजे विधानभवनाच्या प्रवेशद्वारावर आले. याठिकाणी घोषणाबाजी करुन त्यांनी परिसर दणाणून सोडला.

यानंतर त्यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन सुरु केले. त्यामुळे विधानभवनात जाताना राष्ट्रवादीचे नेते आ. सुनिल तटकरे यांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्यासोबत बसून आंदोलनास पाठिंबा दिला तर, आ. बाळासाहेब पाटील, आ. दीपक चव्हाण, कॉंग्रेसचे आ. सतेज उर्फ बंटी पाटील यांच्यासह आ. राजेश टोपे, आ. राहूल बोंद्रे यांनीही त्यांना पाठिंबा दिला . भाजपाचे माजी आ. डॉ. दिलीप येळगावकर यांनीही काहीवेळ थांबून आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याशी आंदोलनाबाबत चर्चा केली.  राज्य सरकारने या तीनही मागण्या त्वरित मान्य करुन तातडीने पुढील पावले उचलावीत अन्यथा, यापुढे आक्रमक आंदोलन केले जाईल,असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी दिला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)