बोंडअळी अनुदानासाठी राक्षीत शेतकऱ्यांचा रास्तारोको

File photo

लेखी आश्‍वासन दिल्यानंतर दोन तासा चाललेले आंदोलन मागे
शेवगाव – बोंडअळीचे प्रलंबित अनुदान शेतकऱ्यांना त्वरीत अदा करावे, यासह अन्य मागण्यांसाठी शेवगाव-गेवराई राज्यमार्गावर राक्षी येथे सोमवारी सकाळी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. नायब तहसीलदार एम.बी. गायकवाड यांनी येत्या गुरुवारपर्यंत अनुदान बॅंकेत शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग होईल, असे लेखी दिल्यानंतर आंदोलन आटोपते घेण्यात आले.
ठाकुर निमगावचे सरपंच गहिनीनाथ कातकडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी कातकडे म्हणाले, गेल्यावर्षी शासनाने बोंडअळीने बाधिक कपाशी पिकास अनुदान जाहिर करण्यात आले. ते उशीराने शेवगाव तालुक्‍यातील काही गावांना वितरीत झाले. त्याला 1 महिन्याहून अधिक काळ लोटला. परंतु, ठाकुर निमगाव, माळेगावने, नजिक बाभुळगाव व राक्षी या गावातील शेतकरी अद्यापही अनुदानापासून वंचित आहेत. वारंवार विनंती करून देखील प्रशासनाकडून दखल घेतली गेली नाही,असा आरोप त्यांनी केला.
शासनाने मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाचा प्रश्‍न त्वरीत मार्गी लावावा, यंदा पाऊस न झाल्यान पिके जळून गेली आहेत. शासनाने त्वरीत दुष्काळ जाहीर करावा. पिक विम्याची रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, राक्षी गावाचा चार महिन्यांपासून खंडित पाणीपुरवठा पुर्ववत सुरू करावा, या मागण्या यावेळी करण्यात आल्या. प्रभाकर होळकर, जालिंदर घावटे, बबन खंडागळे, सखाराम सराफ, गंगुबाई खोलासे, आप्पासाहेब औटी, शंकर झुंबड, जनार्दन मगर, विठ्ठल मरकड, राजेंद्र कातकडे भारत निजवे आदींची भाषणे झाली.
रामनाथ राजपुरे, कृष्णा झुंबड, राजेंद्र फाटे, भक्तराज कातकडे, छबूलाल सय्यद, पंढरीनाथ सुडके, नामदेव खेडकर, शिवनाथ खेडकर, हरिचंद्र निजवे, रमेश कातकडे, भारत निजवे, आदिनाथ कातकडे, नारायण निजवे, आत्माराम निजवे, ज्ञानदेव कातकडे, रघुनाथ घोरपडे, भारत चव्हाण यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आंदोलनामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून वाहतुक ठप्प झाली होती. पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने आंदोलन शांततेत पार पडले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)