बॉल टेम्परिंग प्रकरण ‘या’ कॅमेरामनने आणले उघडकीस

मेलबर्न : ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानची कसोटी मालिका बॉल टेम्परिंग प्रकरणामुळे चांगलीच वादात सापडली आहे. या सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलियाच्या बॅनक्रॉफ्टने बॉल टेम्परिंग केल्याचा प्रकार पंचाच्या लक्षात आला नाही. पण टेम्परिंगचा हा प्रकार एका कॅमेरामनने सर्वांसमोर आणला.

वीरेंद्र सहवागने मैदानातील या कॅमेरामनचा फोटो ट्वीट केला आहे. वीरुने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले, “या व्यक्तीकडे लक्ष देऊन पाहा. ऑस्कर द कॅमेरामन. इस कॅमरामनसे बचना मुश्किल ही नही नामुमकिन है.”

ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका कसोटीच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा बॅनक्रॉफ्टने खिशातून सँडपेपर काढून, आधी चेंडू त्या सँडपेपरने घासला आणि मग तो सँडपेपरचा तुकडा पुन्हा आपल्या पँटच्या आत दडवला. यातून पंचांना काही शंका आली, त्यानंतर त्यांनी बॅनक्रॉफ्टला बोलावून प्रश्न विचारले. पण त्याने आपल्या खिशातून दुसरी कापडी वस्तू काढून दाखवली. ही वस्तू चष्मा ठेवण्याच्या केससारखी होती. ज्यामुळे पंचांनी पुन्हा खेळ सुरु करण्यास परवानगी दिली.

पण काही वेळातच बॅनक्रॉफ्टच्या कृत्याचे हे संपूर्ण दृश्य टेलिव्हिजन कॅमेराने टिपल्याने बॅनक्रॉफ्टला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. बॅनक्रॉफ्टचे हे कृत्य ज्या कॅमेरामनने टिपले, त्याचा फोटो सेहवागने ट्वीट केला आहे.

दरम्यान, आयसीसीने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरुन बॅनक्रॉफ्टवर बॉल टेम्परिंगप्रकरणी कारवाई केली आहे. आयसीसीने स्मिथवर सामना मानधनाच्या शंभर टक्के दंड ठोठावला आहे आणि एका कसोटी सामन्याची बंदीही घातली आहे. तर बॅनक्रॉफ्टला 75 टक्के दंड ठोठावला असून तीन डिमेरीट्स पॉईंट देण्यात आले आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन ऑस्ट्रियन क्रिकेट बोर्डही स्टीव्ह स्मिथवर कारवाई केली आहे. स्टीव्ह स्मिथला कर्णधारपदावरुन पायउतार व्हावं लागलं आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)