“बॉल टॅम्परिंग’ हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान

ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांचे नि:संदिग्ध प्रतिपादन


कठोर कारवाई करण्याची क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे मागणी


क्रिकेटची प्रतिमा आणि प्रतिष्ठा वाचविण्यासाठी प्रयत्न करा

सिडनी – सभ्य गृहस्थांचा खेळ म्हटल्या जाणाऱ्या क्रिकेटमध्ये स्लेजिंग किंवा शेरेबाजीचे भूत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटूंनीच आणले. तसेच चेंडूचा आकार बदलण्यासारख्या अखिलाडू कृत्यांमध्येही ऑसी क्रिकेटपटू आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. परंतु दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत सिद्ध झालेल्या “बॉल टॅम्परिंग’ प्रकरणामुळे संपूर्ण क्रिकेटविश्‍वाला हादरा बसला आहे.

या पार्श्‍वभूमीवर ऑसी खेळाडूंनी केलेले “बॉल टॅम्परिंग’चे कृत्य ही धक्‍कादायक बाब असून हा संपूर्ण ऑस्ट्रेलियाचा अपमान असल्याचे नि:संदिग्ध प्रतिपादन ऑस्ट्रेलियन पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांनी आज केले.

तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे केली. जगभरात लोकप्रियतेच्या शिखरावर असलेल्या क्रिकेटची प्रतिमा अशा घटनांमुळे काळवंडली असल्याचे सांगून टर्नबुल म्हणाले की, क्रिकेटला पुन्हा एकदा प्रतिष्ठेचे स्थान मिळवून देण्यासाठी स्लेजिंग किंवा शेरेबाजी, तसेच “बॉल टॅम्परिंग’सारख्या कृत्यांविरुद्ध कडक कारवाई करणे गरजेचे आहे.

पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंमध्ये मैदानावर रंगलेली स्लेजिंगची जुगलबंदीही गाजली होती. ऑसी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर व आफ्रिकेचा क्‍विन्टन डी कॉक यांच्यातील शाब्दिक चकमक टोकाला पोहोचली होती. परिणामी उभय संघांचे खेळाडू पॅव्हिलियनकडे परतत असताना डी कॉकवर धावून जाणाऱ्या वॉर्नरला सहकाऱ्यांनी रोखल्याचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

उभय संघांमधील या शत्रुत्वाची परिणती “बॉल टॅम्परिंग’मध्ये झाल्याचे मानले जात आहे. त्यामुळेच ऑसी पंतप्रधान टर्नबुल यांनी स्लेजिंगविरुद्धही कठोर पावले उचलण्याची मागणी केली आहे. दरम्यान येत्या शुक्रवारी सुरू होत असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात निलंबनाची शिक्षा भोगणाऱ्या डेव्हिड वॉर्नरच्या जागी सलामीवीर मॅथ्यू रेनशॉ याचा समावेश करण्यात आला आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)