बॉल टॅम्परिंग प्रकरण : डेविड वॉर्नरलाही झाले अश्रू अनावर

सिडनी: बॉल टॅम्परिंग प्रकरणी १२ महिने क्रिकेटबंदीची शिक्षा झालेला ऑस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेविड वॉर्नर याने माफी मागितली आहे. सिडनीत शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्याला रडू कोसळले आणि त्याने झाल्या प्रकाराबद्दल दुःख व्यक्त केले.

बॉल टॅम्परिंग केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाने स्मिथसह वॉर्नरवरही १२ महिन्यांची बंदी घातली आहे. या कारवाईनंतर स्मिथने पत्रकार परिषद घेऊन माफी मागितली होती. संपूर्ण पत्रकार परिषदेत तो क्रिकेट चाहत्यांची माफी मागत होता. याशिवाय त्याला भर पत्रकार परिषदेत अश्रू अनावर झाले होते. स्मिथच्या पत्रकार परिषदेनंतर आता डेविड वॉर्नरनंही पत्रकार परिषद घेतली. संपूर्ण पत्रकार परिषदेत वॉर्नर सातत्यानं माफी मागत होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)