बॉलीवूडमध्ये हिट होण्यासाठी स्टार किड होण्याची आवश्‍यकता नाही- राधिका मदन

विशाल भारद्वाजच्या “पटाखा’मधून बॉलीवूडमध्ये एन्ट्री करणाऱ्या राधिका मदनच्या मते, बॉलीवूडमध्ये यशस्वी होण्यासाठी स्टार किड असणे आवश्‍यक आहे, हा एक गैरसमज आहे. विशाल भारद्वाजच्या सिनेमातून एन्ट्री करण्याची संधी मिळाल्याने ती स्वतःला भाग्यवान समजते आहे.

खरे तर तिला अॅक्‍टिंग करिअरमध्ये यायचे नव्हते. तिला नृत्यात करिअर करायचे होते. तिचा डान्स परफॉर्मन्स कोणीतरी फेसबुकवर बघितला आणि अॅक्‍टिंगची ऑफर मिळाली. सुरुवातीच्या काळात एकता कपूरच्या सिरीयलमधून घराघरात पोहोचलेल्या राधिका मदनकडे एकाचवेळी दोन सिनेमे आहेत.

“मर्द को दर्द नहीं होता’चे शुटिंग सुरू असतानाच तिने “पटाखा’साठीची ऑडिशन दिली होती. त्यातील चंपा कुमारीचा रोल राधिकाला प्रत्यक्ष जीवनात जगायची इच्छा झाली, इतके या रोलने तिला प्रभावित केले. हा रोल प्रेक्षकांपर्यंत भिडण्यासाठी तो कोणा स्टारकिडने साकारायला पाहिजे असे अजिबात नाही. चांगल्या रोलला न्याय मिळणे महत्त्वाचे असते, असे राधिका मानते.

या रोलसाठी जेंव्हा ऑडिशनला जायचे आहे, असे समजले तेंव्हा तिच्याजवळ रिहर्सल करण्यासाठी कोणतीही जागा नव्हती. त्यातही गावाकडच्या ढंगातले डायलॉग बोलण्याची प्रॅक्‍टिस करायची म्हणजे घरापासून दूर जायला पाहिजे होते. जिथे कोणी ओळखणार नाही, अशा ठिकाणी म्हणजे गोवा विमानतळाच्या परिसरात जाऊन तिने ऑडिशनची प्रॅक्‍टिस केली होती.

“पटाखा’मध्ये सान्या संन्यालच्या मोठ्या बहिणीचा रोल करते आहे. आपल्याला मिळालेल्या मोठ्या बहिणीचा रोल करताना तिने आपल्या मोठ्या भावाला डोळ्यासमोर ठेवले होते. धाकट्या बहिणीला समजून घेण्याची अपेक्षा असताना रागावणाऱ्या भावाकडूनच तिला या रोलबाबतचे इक्‍वेशन सापडले. गंमत म्हणजे सान्या आणि राधिकाने या रोलसाठी आपले 10-10 किलो वजन वाढवले होते. आता तेच वजन तिला कमी करायला लागते आहे. या सिनेमासाठी तिला पहिल्यांदा सिगारेट ओढायला लागली. आतापर्यंत कधीही सिगारेटला हातही न लावलेल्या राधिकासाठी हे काम खूप अवघड होते. त्यासाठी तिला हर्बल सिगारेटचा अनुभव घ्यावा लागला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)