बॉलीवूडमध्ये वशिलेबाजी आहे – जान्हवी

वशिलेबाजीच्या मुद्द्यावरून बॉलिवूडमध्ये नेहमीच वाद रंगलेला असतो. या मुद्द्यावरून बॉलीवूडमध्ये उभे दोन तट पडलेले काही दिवसांपूर्वी बघायला मिळाले होते. सर्वात पहिल्यांदा कंगणा रणावतने “कॉफी विथ करण’मध्ये या विषयाला वाचा फोडली होती. त्यानंतर करण आणि कंगणामध्ये बऱ्याच दिवसांपासून एकमेकांवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न सुरु होता. जे लोक फिल्म इंडस्ट्रीच्या बाहेरून या क्षेत्रात करिअर करण्यासाठी आले, त्यांना जास्त स्ट्रगल करायला लागतो, असे अनेकांना वाटते. आश्‍चर्य म्हणजे श्रीदेवीची कन्या जान्हवी कपूरनेही या मताला दुजोरा दिला आहे.

‘धडक’मधून पदार्पण करणाऱ्या जान्हवीच्या पहिल्याच सिनेमाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. तिच्या अभिनयाच कौतुकही झाले. त्यानंतर तिला या वशिलेबाजीबाबत विचारले असता तिने आपले परखड मत सांगितले. “मला बॉलीवूडमध्ये जे स्थान मिळाले आहे, त्यास मी पात्र आहे का असे विचारले तर मी “नाही’ असेच सांगेन. मी या स्टारडमला लायकच नाही. बॉलिवूडमध्ये येणे माझ्यासाठी खूपच सोपे होते. माझी खूप कष्ट करण्याची तयारी आहे. माझे काम खूप चांगले व्हावे यासाठी स्वतःमध्ये सुधारणा करण्यासही मी सततच तयार असेन. कारण उद्या मला वशिलेबाजीमुळे हे यश मिळाले आहे, असे कोणी म्हणू नये.’ असे ती म्हणाली. स्टार झाल्यावर मिडीयाचे लक्ष आपल्याकडे लागून राहिले असणार याची तिला जाणीव आहे. मिडीयामधून आपल्याबाबत खूप छापून येणे स्वाभाविक आहे. आपल्याबाबत प्रसार माध्यमांमध्ये खासगी गोष्टी छापून येऊ शकतील. पर्सनल आणि प्रोफेशनल गोष्टींमध्ये समतोल कसा राखायचा, याची तिला चांगली जाणीव आहे. मात्र मिडीयाकडून मिळणाऱ्या अटेन्शनबाबत तिने कधीच तक्रार केलेली नाही.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा, आलिया भट्ट आणि सारा अली खान सारख्यानी आपल्या अभिनयाच्या आधारे बॉलीवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान बनवले आहे, ही चांगली गोष्ट आहे, हे देखील ती मान्य करते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)