बॉलीवूडमध्ये मिसमॅच्ड कपल्सचा जमाना

बॉलीवूडमधील कपल्स खरोखरच वेडी असतात. प्रेमासाठी काय वाट्टेल ते करायला तयार होतात. पब्लिकची पर्वा न करता कशाचाही विचार न करता आपल्याला शोभून न दिसणाऱ्या जोडीदाराबरोबर लग्न करून रिकामे होतात. या वर्षात अशाच काही विजोड जोड्या बघायला मिळाल्या आहेत. यामध्ये प्रियांका चोप्रापासून गिन्नी चतरथपर्यंत अनेकींचे नाव घेता येऊ शकेल. यातील पहिली जोडी आहे प्रियांका चोप्रा आणि निक जोनास यांची. 2 डिसेंबरला जोधपूरमध्ये मोठ्या थाटामाटाने विवाहबद्ध झालेल्या प्रियांकाला तिच्यापेक्षा 10 वर्षांनी लहान असलेला निक नवरा म्हणून कसा काय पसंत पडला कोणास ठाऊक, प्रियांका 36 तर निक 26 वर्षांचाच आहे.

दुसरे नाव आहे मिलिंद सोमण आणि अंकिता कुंवर यांचे. मिलिंदपेक्षा अंकिता जवळजवळ 26 वर्षांनी लहान आहे. त्यांचे अफेअर बरेच वर्षे सुरू होते. तेंव्हापासून त्यांचे ऑड वयातले रिलेशन सर्वांना माहिती झाले होते. टिव्ही अॅक्‍टर प्रिन्स नरुला आणि युविका चौधरी यांचेही लग्न यावर्षी खूप गाजले. युविका 35 वर्षांची तर प्रिन्स 28 वर्षांचा आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

टीव्हीवरच्या कॉमेडी शो मुळे चर्चेत आलेला कपिल शर्माही यंदा विवाहबद्ध झाला. त्याची पत्नी गिन्नी चतरथपेक्षा तो 8 वर्षांनी मोठा आहे.

एमटीव्हीवरील सुपरहिट रिअॅलिटी शो रॉडिजचा जज रघु राम आणि त्याच्यापेक्षा 14 वर्षांनी लहान असलेली गायिका नताली डि ल्युसिओ यांचे लग्न काही दिवसांपूर्वीच गोव्यात झाले. रघु राम 43 तर नताली 29 वर्षांची आहे.

अशीच एक विजोड जोडी यावर्षी गाजली ती म्हणजे “बिग बॉस’मध्ये भावगीत गायक अनुप जलोटा आणि त्यांची मैत्रिण जसलीन मथारू. या दोघांनी केवळ चर्चा वाढवण्यासाठी “बिग बॉस’मध्ये जोडीने प्रवेश केला होता, याचा उलगडा नंतर झाला. दुपटीपेक्षा मोठ्या जलोटा अंकलबरोबर जसलीनचे प्रेमाचे वागणे बघून प्रेक्षकांना तिटकाराच आला होता. पण करता काय, प्रेम वेडं असतं असे म्हणून गप्प बसायची वेळ येते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)