बॉलीवूडमध्ये खुशी कपूर-आर्यनचे लवकरच पदार्पण

प्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मोठी मुलगी जान्हवी कपूरला बॉलीवूडमध्ये पदार्पण करून दिल्यानंतर आता करण जोहर त्यांची दुसरी मुलगी खुशी कपूरला बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे. तसेच करण जोहर हा खुशी कपूरला शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसोबत बॉलीवूडमध्ये डेब्यू करणार आहे.

खुशी आणि आर्यन यांचे जबरदस्त पदार्पण करण्यासाठी करण एक चांगली स्क्रिप्ट तयार करीत आहे. या दोघांच्या डेब्यूसाठी करणने एक मोठा प्लॅन बनविला आहे. मात्र, करणने अद्याप त्याला दुजोरा दिलेला नाही. पण असे झाल्यास बॉलीवूडमध्ये एकद धम्माल उडेल. खुशी आणि आर्यन यांची पर्सनॅलिटी जबरदस्त असून ते सध्या दोघेही शिक्षणासोबत ग्रूमिंग क्‍लासेस करत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दरम्यान, करण जोहर याने आतापर्यत अनेक स्टार किड्‌सचे बॉलीवूडमध्ये यशस्वीपणे पदार्पण करून दिले आहे. यात आलिया भट्‌ट, वरूण धवन, सिद्धार्थ मल्होत्रापासून जान्हवी कपूर आदी कलाकारांचा समावेश आहे. आता करण जोहर हा चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेलाही आगामी “स्टूडेंट ऑफ द इयर 2′ या चित्रपटातून लॉन्च करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)