बॉलीवुडमध्ये ईसाबेल करणार पर्दापण

अभिनेत्री कैटरीना कैफची छोटी बहिण ईसाबेल कैफ लवकरच बॉलुवडमध्ये डेब्यू करण्याच्या तयारीत आहे. बॉलीवुडमधील तिच्या पर्दापणाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. मात्र, आता अभिनेता सूरज पांचोली यांना आपल्या इंस्टाग्रामवर ईसाबेलचे फोटो शेयर करून ईसाबेलच्या बॉलीवुड पर्दापणाची अधिकृत घोषणा केली.

सूरजने माहिती दिली की, ईसाबेलसोबत तो “टाइम टू डान्स’ चित्रपटात काम करणार आहे. माझी को-स्टार ईसाबेल कैफचे आता जोरदार स्वागत करा. आमचा चित्रपट “टाइम टू डान्स’ लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. मीही ईसाबेलसोबत काम करण्यासाठी उत्सूक आहे, अशी माहिती त्याने इंस्टाग्रामद्वारे दिली आहे.

“टाइम टू डान्स’चित्रपटात डान्सला प्राधान्य देण्यात आले असून यात पुन्हा एकदा सूरजच्या सर्वोत्कृष्ट डान्स मूव्स प्रेक्षकांना पाहण्यास मिळणार आहे. तसेच ईसाबेलही एक उत्कृष्ट डान्सर असल्याचे समजते. त्यामुळे निश्‍चितच सूरज-ईसाबेलच्या चाहत्यांसाठी “टाइम टू न्डास’च्या प्रदर्शनाची उत्सूकता कायम राहणार आहे.

या चित्रपटाचे शुटिंग एप्रिल महिन्यात सुरू करण्यात येणार आहे. यात ईसाबेल मूळ लॅटीनमधील बॉलरूम डान्सरची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रेमो डिसूजाचा सहाय्यक स्टॅनली डि-कोस्टा हा करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)