बॉलिवूड सेलिब्रिटींचे ट्विटरवरील लाखो फॉलोअर्स एकदम कमी

सेलिब्रिटींना आपल्या चाहत्यांपर्यंत पोहोचण्यासाठी सोशल मीडिया सोपं आणि प्रभावी माध्यम आहे. खासकरून ट्विटरवर सेलिब्रिटी जास्त प्रमाणात अॅक्टिव्ह असतात. मात्र अनेक सेलिब्रिटींचे ट्विटरवरील फॉलोअर्स अचानक कमी झाले आहेत. बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान यांचे फॉलोअर्सही कमी झाले आहेत.

सफाई अभियानामुळे हे फॉलोअर्स कमी झाल्याचं ट्विटरने स्पष्ट केलं आहे. ट्विटरवर अशी अनेक अकाऊंट्स आहेत, जी निष्क्रिय आणि लॉक्ड आहेत. अशा अकाऊंट्सला ट्विटरने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अमिताभ बच्चन यांचे 4,24,000, शाहरुख खानचे 3,62,141 आणि सलमान खानचे 3,40,884 फॉलोअर्स कमी झाले आहेत.

ट्विटरच्या फॉलोअर्सच्या संख्येवर लक्ष ठेवणाऱ्या सोशलब्लेड डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, आमीर खानचे 3,16,900, प्रियंका चोप्राचे 3,54,830 आणि दीपिका पदुकोणचे 2,88,298 फॉलोअर्स कमी झाले आहेत. ट्विटरने सुरु केलेल्या सफाई अभियानाचा सर्वाधिक फटका बॉलिवूड सेलिब्रिटींना बसण्याची शक्यता आहे.

अभिनेत्री दिव्या दत्ताने फॉलोअर्स कमी होण्याबाबत ट्वीट केलं आहे. दिव्याने लिहिलं की, ‘अय्यो, काय झालं ट्विटर? एक तासाच एवढे फॉलोअर्स कमी झाले.’ दिव्याचे ट्विरटवर 4,90,000 फॉलोअर्स होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)