बॉम्बच्या अफवेने लष्कर परिसरात धावपळ

– “बीडीडीएस’ पथकाने केली कसून तपासणी  

पुणे – लष्कर परिसरातील एसजीएस मॉलसमोर सोमवारी दुपारी 12 वाजता बेवारस बॉक्‍समुळे बॉम्ब असल्याची अफवा पसरली होती. दरम्यान, बॉम्बशोधक व नाशक पथकाने (बीडीडीएस) तत्काळ घटनास्थळी जाऊन तपासणी केल्यानंतर बॉक्‍समध्ये जेवण असल्याचे आढळून आले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्त्याच्या बाजूला असलेल्या एसजीएस मॉलच्या प्रवेशद्वारासमोरील मोकळ्या जागेमध्ये एक बॉक्‍स बेवारस असल्याचे एका रिक्षाचालकाच्या निदर्शनास आले. रिक्षाचालकाने याबाबत मॉलच्या प्रशासनासह बंडगार्डन पोलिसांना खबर दिली. मॉल प्रशासनातील यंत्रणेने तपासणी केली असता, त्यांना “अलर्ट’ मिळाला. त्यानंतर पोलीस नियंत्रण कक्षातून “बीडीडीएस’ पथकाला खबर देण्यात आली.

पथकाने अवघ्या 8 मिनिटांत घटनास्थळी दाखल होऊन तपासणी सुरू केली. प्रारंभी “बीडीडीएस’च्या “सूर्या’ श्‍वानाने पाहणी केली. त्यानंतर “बीडीडीएस’कडील अन्य यंत्रसामग्रीद्वारे बेवारस वस्तूंची पाहणी करण्यात आली. सापडलेल्या बॉक्‍समध्ये जेवण आढळून आले असल्याची माहिती “बीडीडीएस’चे पोलीस निरीक्षक विजय शिंदे यांनी दिली. या पथकात साहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव तोदले, पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बैसाने, पोलीस कर्मचारी प्रशांत शिंदे, रवी धुमाळ, सौदागर माने, पवन घोरपडे, बाळासाहेब लोखंडे, नारायण पेहेरेकर यांचा समावेश होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)