‘बॉईज’ सिनेमाच्या सिक्वेलची घोषणा

विशाल देवरुखकर दिग्दर्शित ‘बॉईज’ या अल्पावधीतच सुपरहिट ठरलेल्या सिनेमाचा ‘नॉइज’ संपूर्ण महाराष्ट्रात दुमदूमत आहे. सुप्रीम मोशन पिक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडचे लालासाहेब शिंदे आणि राजेंद्र शिंदे निर्मित, या सिनेमाला तरुणवर्गाने अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले आहे. किशोरवयीन मुलांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या या सिनेमाला दिलेल्या उदंड प्रतिसादाखातर, ‘बॉईज’ च्या टीमने खास आपल्या प्रेक्षकांसाठी ‘लंपटझंपट’ ची म्युजीकल ट्रीट देऊ केली आहे. शिवाय याच पार्टीत २०१९ ला बॉईज सिनेमाचा सिक्वेल घेऊन येणार असल्याची अधिकृत घोषणा देखील निर्मात्यांनी केली. लोअर परळ येथे दिमाखात झालेल्या या सिनेमाच्या सस्केस पार्टीमध्ये सिनेमातील सर्व कलाकारांना आकर्षक सन्मानचिन्ह देत पुरस्कृत करण्यात आले, शिवाय फेसबुक लकी विनर ठरलेल्या विजेत्या स्पर्धकाला ई सायकलदेखील देण्यात आली.

-Ads-

संजय जाधव, अंकुश चौधरी, अमितराज, संचित पाटील, आनंद इंगळे तसेच वैशाली सामंत, रीना अगरवाल या सिनेतारकांची मांदियाळीदेखील या पार्टीतील आकर्षणाचा विषय ठरला . शिवाय प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले अभिनेते सचिन पिळगावकर यांनी हा सिनेमा येत्या दोन दिवसात १० करोडचा आकडा पार करेल, अशी भविष्यवाणी करत सिनेमाला भरघोस शुभेच्छा दिल्या. सध्या या सिनेमाचे दोन आठवड्यांचे कलेक्शन पाहिले असता, मराठी प्रेक्षकवर्ग मोठ्याप्रमाणात या चित्रपटाकडे वळत असल्याचे लक्षात येईल. या सिनेमाने दुसऱ्या आठवड्यात ३०० वरून ३५० थिएटर्स आणि २८०० शोजवरून ४००० शोजवर बाजी मारली असून, ८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून ते रविवार दि. १७ सप्टेंबरपर्यत ‘बॉईज’ सिनेमाने ८ करोड ४० लाखचा गल्ला कमावला आहे. शिवाय या सिनेमाची वाढती मागणी लक्षात घेता अनेक थिएटर मालक या सिनेमासाठी अधिक वेळ देण्याची तजवीज करताना दिसून येत आहेत. तीन मित्राची न्यारी दुनिया आणि त्यांच्या विनोदाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटात संतोष जुवेकर, झाकीर हुसेन, वैभव मांगले, शिल्पा तुळसकर, शर्वरी जेमिनेस, रितिका शोत्री यांच्यादेखील भूमिका आहेत. पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतिक लाड ह्यांची प्रमुख भूमिका असलेला हा सिनेमा यावर्षीचा सर्वाधिक कमाई करणा-या मराठी सिनेमाच्या यादीत आग्रस्थानावर लवकरच कूच करणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup: Thumbs up
2 :heart: Love
2 :joy: Joy
2 :heart_eyes: Awesome
2 :blush: Great
2 :cry: Sad
2 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)