“बॉईज’च्या शूटिंगदरम्यान घाबरला संतोष जुवेकर!

रात्री-अपरात्री अचानक आपल्या दरवाजावर थाप बसली, तर काय होईल? आणि त्याचवेळी चित्रविचित्र आवाज आणि हालचाली दिसू लागल्या तर! घाम फुटला ना! असंच काहीसं घडलेय संतोष जुवेकरसोबत. “बॉईज’ या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान संतोषला व्हॅनीटी व्हेनमध्ये अश्‍याच एका प्रसंगाला सामोरे जावे लागले होते. तो गाडीत एकटा असताना कोणीतरी दरवाजा ठोकतोय, असा त्याला भास होत असत. एकदा दोनदा त्याने दार उघडून पहिले देखील, मात्र त्याला कोणीच दिसले नाही. शिवाय काही विचित्र आवाजदेखील त्याला ऐकू येत असत.

पुणे शहरापासून दूर भोर गावात या सिनेमाचे चित्रीकरण होत असल्यामुळे गावठिकाणी, गर्द झाडीत सलग कित्येक दिवस त्याला असे भास होत असल्याने, तो खूप अस्वस्थ झाला होता. आपल्यासोबत होत असलेल्या या गोष्टीची वाच्यता त्याने अखेर सिनेमाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर यांच्याकडे केली, आणि त्यानंतर संतोषला सतावत असलेल्या भूतांचा शोध लागला.

संतोषला त्रास देत असलेली ही तीन भूतं म्हणजे पार्थ भालेराव, सुमंत शिंदे आणि प्रतीक लाड आहेत, हे जेव्हा समजले तेव्हा सेटवर सर्वत्र हशा पिकला. किशोरवयीन मुलांच्या आयुष्यावर आधारित असलेला हा सिनेमा येत्या 8 सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)