बैसाखी यात्रेनिमित्त पाकिस्तानात गेलेल्या पंजाबी महिलेचे धर्मांतर

इस्लामाबाद – बैसाखी उत्सवानिमित्त पाकिस्तानात यात्रेला गेलेल्या पंजाबी महिलेने तेथे धर्मांतर करून इस्लाम धर्म स्वीकारला आहे. तिथे लाहोरमध्ये एका व्यक्‍तीबरोबर विवाहदेखील केला असून पाकिस्तानात अधिक काळ राहण्यासाठी व्हिसाला मुदतवाढ मिळण्याची मागणीही केली असल्याचे वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहे.

किरण बाला असे या महिलेचे नाव असून ती पंजाबमधील होशियारपूर जिल्ह्यातील मनोहर लाल यांची कन्या आहे. तिने पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाला पत्र पाठवून व्हिसाला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे. लाहोरमधील मोहम्मद आझम नावाच्या व्यक्‍तीबरोबर 16 एप्रिलला आपला विवाह झाला असल्याचे किरणने म्हटले आहे. लाहोरमध्ये जामिया नईमिया सेमिनरीमधील समारंभात आपला विवाह झाला असल्याचे तिने म्हटले आहे.

-Ads-

किरण बालाने आपले नावही अमना बिबी असे बदलले आहे. सध्याच्या परिस्थितीतीत आपण भारतात परत जाऊ शकत नाही. आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्‍या मिळत आहेत. म्हणून पाकिस्तानात अधिक मुक्काम करण्यासाठी व्हिसाला मुदतवाढ मिळावी असे तिने लिहीलेल्या पत्रात म्हटले आहे. किरण बालाच्या या पत्राबाबत विदेश मंत्रालय किंवा पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्‍तालयाकडून काहीही वक्‍तव्य करण्यात आलेले नाही.

किरण 12 एप्रिल रोजी अन्य शिख यात्रेकरूंबरोबर पाकिस्तानात आली होती. हसन अब्दाल येथील गुरुद्वारा पंजा साहिब येथे बैसाखी उत्सवालाही ती उपस्थित राहिली. तिच्या व्हिसाला 21 एप्रिलपर्यंतची मुदत आहे.यंदाच्या बैसाखी उत्सवादरम्यान भारत आणि पाकिस्तानमध्ये वेगवेगळ्या मुद्दयांवरून तणाव निर्माण झाला आहे. पंजाबी यात्रेकरूंना खलिस्तानच्या मुद्दयावरून चिथावण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केल्याचा आरोप भारताने केला आहे. तसेच भारतीय उच्चायुक्‍तांना या यात्रेकरूंना भेटू न दिल्याचाही आरोप केला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)