पिंपरी – गोठ्यात काम करणाऱ्या एका तरुण कामगाराला बैलाने धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. 13) दुपारी दोनच्या सुमारास काळेवाडी येथे घडली.

शशिकांत चिरोजीलाल धोबी (वय-22, रा. आदर्शनगर, काळेवाडी) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ग्यानसिंग श्रीपत यादव यांच्या काळेवाडी येथील गोठ्यात शशिकांत कामाला होता. नेहमीप्रमाणे तो गोठ्यात काम करत होता. दुुपारी दोनच्या सुमारास बैलाने त्याला जोरदार धडक मारली. त्यात गंभीर जखमी झालेल्या शशिकांतला उपचारासाठी वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्‍टरांनी घोषित केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)