बैलगाडीत दुचाकी ठेऊन इंधनदरवाढीचा निषेध

वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी स्वारगेट चौकात बैलगाडी मध्ये दुचाकी ठेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्राने तातडीने दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली.

पुणे : वाढत्या इंधन दरवाढीच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी स्वारगेट चौकात बैलगाडी मध्ये दुचाकी ठेऊन अनोखे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्राने तातडीने दरवाढ मागे घेऊन सर्वसामान्यांना दिलासा द्यावा अशी मागणी यावेळी पक्षाच्या वतीने करण्यात आली. पक्षाचे शहराध्यक्ष चेतन तुपे तसेच माजी अध्यक्षा आणि खासदार .वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी या भागातील पेट्रोल पंपावर भाजपचा निषेध करण्यासाठी काळया कमळांच्या फुलांचे वाटपही वाहनचालकांना करण्यात आले. यावेळी आंदोलकांच्या वतीने केंद्रशासन तसेच राज्यशासना विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
निवडणूका येताच लोकांना खोटी आश्वासने देउन खोटी स्वप्ने दाखवुन सत्ता हस्तगत केली त्यावेळी इंधन मध्ये थोडी दरवाढ झाली तर आताचे मंत्री लगेच रस्त्यावर उतरुन आंदोलन करायचे परंतु आज त्यांचेच सरकार प्रचंड महागाई वाढवत देखील आज हे मंत्री गप्प का हेत असा सवाल यावेळी खासदार चव्हाण यांनी केला.

तर हे सरकार सामान्य जनतेचे नसुन मुठभर श्रीमंतासाठी काम करणारे असुन पेट्रोल कंपन्यानी हजारो कोटींचा नफा कमावला असुन देखील सरकार भाववाढ कमी करत नाहीये म्हणजेच मोदी सरकारने गोरगरीब जनतेच्या खिशावर टाकलेला हा दरोडाच आहे असा आरोप केला आणि या किमती कमी नाही केल्या तर पुणे शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस च्या वतीने पुणे शहरातील ठिकठिकाणच्या पेट्रोल पंपावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा, शहराध्यक्ष तुपे यांनी यावेळी बोलताना दिला.

पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष विशाल तांबे , पक्षाच्या महिला शहराध्यक्षा रूपाली चाकणकर, माजी नगरसेवक रविंद्र माळवदकर यांच्यासह माजी नगरसेवक आप्पा रेणुसे, नगरसेविका नंदा लोणकर, बाळा धनकवडे, स्मिता कोंढरे,, युवक अध्यक्ष राकेश कामठे,सामाजिक न्याय प्रमुख पंडित कांबळे,युवती अध्यक्ष मनाली भिलारे विध्यार्थी अध्यक्ष रीशी परदेशी , चंद्रकांत कवडे,शशिकांत तापकीर, भोलासिंग अरोरा, मिलिंद वालवडकर,
सुकेश पासलकर, राजुशेठ गिरे,अशोक राठी, फहिम शेख , सागरराजे भोसले,अझीम गुडाकुवाला, शांतिलाल मिसाळ,शिंल्पा भोसले यांच्यासह पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)