बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी 9 जणांना गुन्हा दाखल

मंचर- अवसरी बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असताना देखील याचे आयोजन केल्याचे मंचर पोलिसांनी सांगितले.
या प्रकरणी पोलिसांनी किशोर कोंडीभाऊ हिंगे, संजय जयसिंग हिंगे, विनोद रमेश हिंगे, विजय विष्णु हिंगे, सुमित अनंता हिंगे, नितीन खंडेराव हिंगे, धनेश सुधाकर हिंगे, पवन लक्ष्मण हिले, राहुल आनंद हिंगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अवसरी बुद्रुक येथे शनिवारी (दि. 22) सकाळी साडेदहा वाजता बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोक बैलगाड्या पळवत असल्याचे मंचर पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार एस. डी. बरकडे, पोलिस कर्मचारी एस. बी. गिलबिले, एस. एस. गायकवाड, एस. आर. वाफगावकर, व्ही. बी. वाघ यांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करुन तेथील लोकांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देषानुसार बैलागाडा शर्यतीस बंदी असल्याचे सांगितले. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.
तरी देखील काही लोकांनी बैलगाडा शर्यत सुरू ठेवली. तेथे मोठा जनसमुदाय उपस्थित असल्याने कायदा व सुव्यस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये, म्हणून बैलगाडा शर्यतीचे आयोजन करणाऱ्या 9 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बैलांना चढणीच्या रस्त्याने घाटात चढाला त्यांच्या क्षमतेपेक्षा व ताकतीपेक्षा जास्त पळवल्याने त्यांना यातना होईल, अशा प्रकारे वागणूक दिली आहे. त्यामुळे मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुदर्शन माताडे यांनी संबधितांच्या विरोधात फिर्याद दिली आहे. या घटनेचा तपास मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी सुनिल शिंदे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)