बैजयंत पांडा यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

भुवनेश्‍वर – ओडिशामधील खासदार बैजयंत पांडा यांनी आज लोकसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला. लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्याकडे त्यांनी राजीनामा पत्र पाठवले. ओडिशाचे मुख्यमंत्री आणि बिजू जनता दलाचे (बिजद) प्रमुख नवीन पटनाईक यांच्याशी पांडा यांचा काही महिन्यांपासून दुरावा निर्माण झाला. त्यानंतर पांडा यांनी पटनाईक आणि बिजदवर उघडपणे टीका सुरू केली.

त्यामुळे काही दिवसांपूर्वी पांडा यांना पक्षविरोधी कारवायांबद्दल बिजदमधून निलंबित करण्यात आले. त्यापाठोपाठ मागील महिन्यात पांडा यांनी बिजदला रामराम ठोकला. ते ओडिशाच्या केंद्रपाडा मतदारसंघातून सलग दोन वेळा लोकसभेवर निवडून गेले. बिजदशी फारकत घेतल्यानंतर ते भाजपच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाच तर त्या पक्षाची ताकद वाढणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)