बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी तत्कालीन म्हाडाच्या अभियंत्यावर गुन्हा दाखल

       गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांची माहिती

मुंबई – बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी म्हाडाच्या वांद्रे कार्यालयातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता दीपक पवार यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांवर भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमानुसार एसीबीने गुन्हा दखल केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची खुली तपशीलवार (ओपन डिटेल) चौकशी सुरु असल्याची माहिती गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

या प्रकरणी सदस्य सुनील केदार यांनी प्रश्न उपस्थित केला होता, त्याला उत्तर देताना डॉ.पाटील बोलत होते. ते म्हणाले, म्हाडाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता दीपक पवार यांच्या विरोधात २०१२ मध्ये मुक्त चौकशी झाली असून या उघड चौकशीमध्ये आरोपी पवार यांनी जानेवारी २००१ ते मार्च २०१२ या सेवा कालावधीत कायदेशीर उत्पनापेक्षा जास्त मालमत्ता मिळवल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरोधात ३० जानेवारी २०१८ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची खुली तपशीलवार चौकशी सुरु आहे. मात्र, या प्रकरणात श्री. पवार यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्या मालमत्ता आणि खात्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)