बेस्ट संप : मनसेने कोस्टल रोडचे काम पाडले बंद 

मुंबई – बेस्टच्या संपाचा आजचा सातवा दिवस आहे. परंतु, प्रशासनाला संपावर अद्याप  काढण्यात यश आलेले नाही. संपावर तोडगा निघाला नाहीतर सोमवारी मुंबईत तमाशा करू, असा इशारा मनसेने रविवारीच दिला होता. यानुसार मनसे आज रस्त्यावर उतरली असून कोस्टल रोडचे काम बंद पाडले आहे.

मनसे कार्यकर्त्यांनी कोस्टल रोडच्या कामाला विरोध दर्शवत तेथून सर्व मशिन्स हलविण्यास भाग पाडले आहे. तसेच तात्पुरत्या स्वरूपात उभारण्यात आलेल्या कार्यालयांना टाळे ठोकले आहे. संप मिटत नाही, तोपर्यंत कोस्टल रोडचे काम सुरु करून देणार नसल्याचा इशारा मनसेने दिला आहे. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज ११ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भेट घेणार असून संपाबाबत चर्चा करणार आहेत.

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
– महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
– एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
– अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
– बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
– कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)