बेस्ट कर्मचाऱ्यांनी राज ठाकरेंकडे मांडल्या व्यथा 

मुंबई – बेस्टचे कर्मचारी गेल्या तीन दिवसांपासून विविध मागण्यांसाठी संपावर गेले आहेत. यामध्ये आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उडी घेत या संपाला पाठिंबा जाहीर केला. या पार्श्वभूमीवर बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी राज ठाकरे यांच्याकडे आपल्या व्यथा मांडल्या असून न्याय मिळवून देण्याचीही मागणी केली आहे.

दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज तिसरा दिवस असून प्रशासनाने कठोर भूमिका घेत मेस्मांतर्गत कर्मचाऱ्यांना वसाहतीतील घरे रिकामी करण्याच्या नोटिसा पाठविल्या आहेत. या कारवाईमुळे कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. याप्रश्नी शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे आता स्वतः मध्यस्थी करणार आहेत. आज दुपारी महापौर, बेस्ट समिती अध्यक्ष आणि आयुक्तांसोबत उद्धव ठाकरे यांची बैठक होणार आहे. या बैठकीत काय तोडगा निघेल याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काय आहेत बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या?
– महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणे 2016-2017, 2017-2018 या काळातील सानुग्रह अनुदान मिळणे
– एप्रिल 2016पासून लागू होणाऱ्या वेतन कराराच्या तातडीने वाटाघाटी
– अनुकंपा तत्त्वावर तातडीने भरती
– बेस्ट उपक्रमाचे महापालिकेत विलीनीकरण करण्याचा महापालिका महासभेत मंजूर झालेल्या ठरावावर अंमल
– कामगारांच्या निवासस्थानाचा प्रश्न सोडवणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)