बेशिस्त 249 रिक्षाचालकांवर कारवाई

पुणे – नो पार्किंगमध्ये रिक्षा लावणे, विनागणवेश सेवा देणे, भाडे नाकारणे अशा प्रकारच्या बेशिस्त रिक्षाचालकांवर वाहतूक पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. पुणे स्टेशन आणि स्वारगेट परिसरात मिळून 249 रिक्षाचालकांकडून दंड वसूल केला.

शहरात रिक्षाचालकांकडून भाडे नाकारणे, प्रवाशांशी उद्धट वर्तन, मीटरमध्ये बिघाड अशा प्रकारच्या तक्रारी नागरिक करत असतात. यावर प्रादेशिक परिवहन कार्यालय तसेच वाहतूक पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई केली जाते. या पार्श्‍वभूमीवर शनिवारी स्वारगेट आणि पुणे स्टेशन परिसरात शनिवारी सकाळी 11 ते 2 या वेळात ही कारवाई करण्यात आली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

यासाठी वाहतूक पोलिसांचा फौजफाटा तैनात करून रिक्षाचालकांची तपासणी करण्यात आली. त्यांच्याकडून 55 हजार 400 रुपये दंडात्मक रक्कम वसूल केली. यावेळी पोलीस निरीक्षक (नियोजन) अनिल पाटील, पोलीस निरीक्षक (प्रशासन) विजय बाजारे आदींसह वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)