बेशिस्त पुणेकरांना आठ महिन्यात 22 कोटींचा दंड

10 लाख जणांनी मोडला नियम


सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगच्या सर्वाधिक कारवाया

पुणे – स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पुणे शहरातील नागरिकांचे वाहतूक नियम पाळण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे समोर आले आहे. यामुळेच गेल्या आठ महिन्यांत तब्बल दहा लाख बेशिस्त पुणेकरांनी वाहतूक नियमाचा भंग केला असून 22 कोटींचा दंड भरला आहे. यामध्ये सिग्नल मोडणे, झेब्रा क्रॉसिंगवर गाडी उभी करणे, वाहन चालवताना जवळ लायसन्स न बाळगण्याचे प्रमाण सर्वाधिक असल्याचेही समोर आले आहे.

वाहतूक शाखेने सुरू केलेल्या ऑनलाइन दंड वसुली आणि सीसीटीव्ही कारवाईमधून 10 लाख 18 हजार 560 जणांकडून तब्बल 22 कोटी 54 लाख 62 हजार 259 रुपयांचा दंड वसूल केला आहे. हा दंड जानेवारी ते ऑगस्ट 2018 या आठ महिन्यांतील आहे. यामुळे बेशिस्त वाहनचालकांचे शहर अशी नवी ओळख निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये किरकोळ चुका वाहनचालकांकडून अधिक प्रमाणात होत असल्याचे दिसून आले आहे. यामुळेच झेब्रा क्रॉसिंग, सिग्नल मोडणे, सिट बेल्ट न लावणे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे सोबत वाहन परवाना न बाळगणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. तसेच “नो एंट्री’मध्ये वाहन घालणे, नो पार्किंग, सुसा वाहन चालविणे, हेल्मेट न वापरणे, काळ्या काचा लावणे, जोरजोरात हॉर्न वाजविणे, कागदपत्र जवळ न बाळगणे, विरुद्ध दिशेने येणे, पदपथावर वाहन लावणे अथवा चालवणे यासोबतच फॅन्सी नंबर प्लेट आदी केसेसचे प्रमाण आहे.

एकूण केसेस – 10 लाख 18 हजार 560


एकूण भरलेला दंड – 22 कोटी 54 लाख 62 हजार 259


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)