बेशिस्त चालकांमुळे पीएमपीला आर्थिक भुर्दंड

File Photo

यापुढे चालकाच्या पगारातून कापली जाणार रक्‍कम

पुणे – बस चालविताना डबल पार्किंग, नो पार्किंगच्या ठिकाणी बस उभी केल्यास वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई करण्यात येते. यामुळे पीएमपीला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असून यापुढे हा दंड चालकाच्या पगारातून वसूल करण्यात यावा, असे आदेश वाहतूक व्यवस्थापकांकडून डेपोस्तरावरील अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

पीएमपी बसेसला एका शिफ्टसाठी एका बसवर चालक आणि वाहक ठरवून दिले जातात. यातील काही बेशिस्तांकडून बस कोठेही उभी करून वाहतुकीस अडथळा आणला जातो. यावर वाहतूक पोलीस सुमारे पाच हजार दंड आकारतात. यामुळे पीएमपी प्रशासनाला मोठा भुर्दंड सहन करावा लागत असल्याने हा दंड आता संबंधित चालकाकडून वसूल करण्यात येणार आहे. प्रशासनाने यासंबंधीचे आदेश काढले असून संबंधित वाहतूक अधीक्षकांनी चालकाच्या पगारातून ही रक्कम वसूल करावी, असे सांगण्यात आले आहे. चालकाने पार्किंगच्या ठिकाणीच बस उभी करावी, असा सूचनाही देण्याचे सांगण्यात आले आहे.

पार्किंगचा प्रश्‍न गंभीर
पीएमपी बस पार्किंगसाठी जागा तुलनेने कमी आहे. यामुळे चालकाला कसरत करावी लागते. पालिका भवनासमोरील जागेवर मेट्रोचे काम सुरू असल्याने येथील बसथांबे हलविण्यात आले. यामुळे पार्किंगला जागाही कमी पडत आहे. इतरत्र लावलेल्या बसेसवर कारवाई होत असून ही रक्कम चालकांकडून वसूल करणे चुकीचे असल्याचे मत काही चालकांनी व्यक्त केले.

बंद गाड्या जागेवर राहील्याने अडचण
पीएमपी पार्किंगसाठी ठिकठिकाणी जागा अपुरी पडत आहे. अशा परिस्थितीत बंद पडलेल्या बसेस रस्त्याच्या कडेला लावण्यात येतात. त्यावेळीच दुरुस्तीसाठी न नेल्याने इतर बसेसला जागा मिळत नसून दंड भरावा लागतो. ठेकेदारांच्या बसेसबाबत ही परिस्थिती असल्याचे चालकांकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)