बेशिस्त एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचे संकेत

सातारा – बेदारकपणे एसटी बस चालवल्याप्रकरणी चालकावर व तक्रार करणाऱ्या नागरिकांसोबत अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या नियंत्रण कक्षातील कर्मचाऱ्यावर कारवाईचे संकेत वरिष्ठांनी दिले आहे. याबाबतची माहिती सातारा आगाराच्या व्यवस्थापकांनी भाजपाचे जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष अमोल कांबळे यांना पत्राद्वारे दिली आहे.

गत महिन्यात सातारा ते आसनगाव जाणाऱ्या बसच्या चालकाने बोगदा परिसरात बेदारकपणे बस चालवत नागरिकांच्या जीवाला धोका होईल, असे वर्तन केले होते. त्यानंतर कांबळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी याची माहिती सातारा बसस्थानकातील नियंत्रण कक्षात दुरध्वनीवरून दिली होती. त्यावेळी चव्हाण नावाच्या कर्मचाऱ्याने कांबळे यांच्यासोबत अर्वाच्य भाषेत वर्तन केल्याचा आरोप कांबळे यांनी एका तक्रारअर्जाद्वारे आगार व्यवस्थापकांच्याकडे केला होता. त्या अर्जाची दखल घेत आगरव्यवस्थापकांनी संबंधीत दोन्ही कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या नियमांनुसार कारवाई करण्याचे कांबळे यांना पत्राद्वारे कळवल्याची माहिती अमोल कांबळे यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)