बेवारस व्यक्तीसाठी पोलीस बनला रुग्णवाहिका चालक

पुणे,दि.16- पोलिस आणी नागरिकांचे संबंध कधिही सौदार्यपूर्ण असल्याचे पहायला मिळत नाहीत. परंतू काही पोलिस कर्मचाऱ्यांमध्ये माणूसकी अद्यापही जीवंत असल्याची उदाहरणे दिसून येतात. अशाच प्रकारच एक घटना दत्तवाडी पोलीस ठाण्यात घडली. रस्त्यात जखमी असलेल्या एका बेवारस व्यक्तीला रुग्णालयात पोहचवण्यासाठी पोलीस हवालदाराने चक्क रुग्णविंहकेचे सारथ्य केले. पोलीस हवालदार राहुल निगडे असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी पोलीस नियंत्रण कक्षाकडून फरशी पुलाजवळ एक व्यक्ती बेशुध्दावस्थेत असल्याची खबर मिळाली. त्यानूसार कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार राहुल निगडे, पोलीस नाईक नवनाथ राणे , पोलीस उपनिरीक्षक मनोज अभंग हे तात्काळ तेथे पोहोचले. त्यांनी तातडीने आजूबाजूच्या परिसरात नातेवाईक सापडतात का याची चौकशी केली. मात्र संबंधीत व्यक्तीची कोणतीही ओळख व किंवा नातेवाईक मिळुन आले नाहीत. यामुळे पोलीस हवालदार राहुल निगडे यांनी तातडीने सामाजीक कार्यकर्ते रुपेश तुरे यांच्याशी संपर्क साधून रुग्णवाहिकेची मागणी केली. रुग्णवाहिका उपलब्ध होती मात्र त्यावर चालक उपलब्ध नव्हता. बेशुध्दावस्थेतील व्यक्तीला तातडीने रुग्णालयात न नेल्यास त्याच्या जीवाला धोका होता. ही बाब लक्षात घेऊन निगडे यांनी स्वत: रुग्णवाहिका घटनास्थळी चालवत आणली . यानंतर नवनाथ राणे यांच्या मदतीने संबंधीत व्यक्तीला ससून रुग्णलयात उपचारासाठी नेले. तेथे तपासणी अंती त्याला मृत घोषीत करण्यात आलो. यानंतर स्वत: राहुल निगडे व नवनाथ राणे यांनी पंचनामा व पुढील कार्यवाही केली.
कर्तव्य परमोधर्म
पोलीस नाईक राहुल निगडे यांनी स्वत:च्या खर्चाने रुग्णवाहिकेत पेट्रोल टाकून रुग्णवाहिका चालवली. संबंधीत व्यक्तीला मदत मिळावी यासाठी तातडीने रुग्णालयात नेले गेले. त्यांनी कर्तव्य बजावून कर्तव्य परमोधर्म या म्हणीचा प्रत्यक्ष प्रत्यय आपल्या कृतीतून आणून दिला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)