बेवारस वाहनांवर कारवाई कधी ?

पिंपरी – शहरातील अनेक पदपथावर बेवारस चारचाकी वाहने धूळखात उभी आहेत. या वाहनांमुळे पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होत आहे. ही वाहने अनेक महिन्यांपासून पदपथावर उभी असल्याने वाहनांबद्दल संभ्रम निर्माण झालेला आहे. यामुळे, धूळखात पडलेली वाहने पोलिसांनी उचलून नेऊन पदपथ मोकळे करावेत, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

शहरातील अनेक पदपथावर गेल्या कित्येक महिन्यांपासून दुचाकी व चारचाकी वाहने पडलेली आहेत. या वाहनांच्या मालकांचा मागमूस नसल्याने स्थानिक पोलिसांनी पंचनामा करुन वाहने पोलीस स्थानकात नेणे आवश्‍यक आहे. तसेच, या वाहनांमुळे पादचाऱ्यांनाही अडथळा निर्माण होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

शहरातील दापोडी ते निगडी दरम्यान अनेक ठिकाणी पदपथावर बेवारस वाहने असल्याचे दिसून आले आहे. या मार्गावर गेल्या दीड वर्षापासून मेट्रोचे काम सुरु आहे. यामुळे, मुख्य रस्ता अरुंद झाल्याने वाहनचालक व पादचाऱ्यांना चालताना कसरत करावी लागत आहे. अनेक वाहनचालक पदपथावरुन वाहने चालवत असल्याने पादचाऱ्यांना अपघात होण्याची शक्‍यता आहे. यामुळे, मुख्य रस्त्यावरील बेवारस वाहनांची योग्य विल्हेवाट लावण्याची आवश्‍यकता आहे.

मोरवाडी चौक, कॅम्प, चिंचवड स्टेशन चौक, आकुर्डी चौक या भागातील पदपथावर दुचाकी व चारचाकी बेवारस वाहने पदपथावर उभी आहेत. यामधील काही वाहने चोरीची असल्याची शक्‍यता नाकारता येत नाहीत. काही वाहनांचे भाग नागरिकांनी काढून नेलेले आहेत. या वाहनांमुळे नागरिकांना चालताना अडथळे निर्माण होत असल्याने पोलिसांनी या वाहनांची योग्य विल्हेवाट लावण्याची गरज असल्याचे, ज्येष्ठ नागरिक दिनकर शेवाळे यांनी सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)