बेवारस वाहनांवर कारवाईला जोर

1 ऑक्‍टोबरपासून सुरुवात : राज्य सरकारकडून कार्यपद्धती जाहीर

पुणे – रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्यात आता महापालिकेबरोबर वाहतूक पोलिसांनीही सहभाग घेतला असून, 1 ऑक्‍टोबरपासून धडक कारवाईला सुरुवात केली आहे. ही वाहने हटवण्याबाबत राज्य सरकारने कार्यपद्धती जाहीर केली असून, तसे आदेशही त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांना दिले आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावरील बेवारस वाहने उचलण्यासंबंधिची कार्यवाही महापालिका करत आहे. परंतु या वाहनांचे मालक शोधणे, गुन्हातील वाहन आहे का याची तपासणी करणे आणि अन्य प्रक्रिया पूर्ण करणे महापालिकेला शक्‍य नाही. त्यामुळे यामध्ये वाहतूक पोलिसांना सहभागी करणे अत्यंत आवश्‍यक आहे. त्यामुळेच आता वाहतूक पोलीसही यामध्ये सहभागी झाले आहेत.

रस्त्यावर सोडून दिलेल्या बेवारस वाहनामुळे रहदारीला अडथळा निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन पोलीस, परिवहन विभागाच्या अखत्यारितील संबंधित कार्यालये यांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अशा वाहनांबाबत तक्रार घेण्यासाठी संपर्क क्रमांकही देण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या आहेत. हेल्पलाइन, व्हॉटस अॅप, ई-मेलद्वारे तक्रारी नोंदवण्याची सुविधा देण्यासंबंधीही सूचना देण्यात आल्या आहेत.

वाहनांचा होणार लिलाव
1 ते 24 ऑक्‍टोबरपर्यंत 12 चारचाकी गाड्या, 15 दुचाकी आणि सहा टेम्पो उचलण्यात आले आहेत. महापालिकेने याकामी चार ते पाच ट्रक, दोन-तीन क्रेनची मागणी वाहतूक पोलिसांनी केली आहे. ती महापालिका पुरवणार आहे. महापालिकेने या आधी 691 वाहने उचलली आहेत. त्या वाहनांतील 21 वाहने मालकांनी दंड भरून नेली आहेत. आणखी 250 वाहनांच्या मालकांचा पत्ता परिवहन विभागाकडून मिळाला असून, त्यांना नोटीसा पाठवल्या आहेत मात्र त्यांचा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अन्य वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)