बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी “व्हॉट्‌स ऍप’ क्रमांक

पिंपरी – रस्त्यावरील बेवारस वाहने हा नेहमीच पोलीस व नागरिकांच्या डोकेदुखीचा विषय आहे. तसेच त्यामुळे वाहतुकीला अडथळा होतो तसेच अपघाताचाही धोका असतो. अशा वाहनांचा वापर घातपातासाठी देखील होवू शकतो. या पार्श्वभूमीवर हिंजवडी पोलिसांनी व्हॉट्‌स ऍप उपक्रम राबवला असून बेवारस वाहनांची माहिती संबंधित क्रमांकावर पाठवावी असे आवाहन करण्यात आले आहे.

हिंजवडी पोलिसांकडून 8208786499 या व्हॉट्‌स ऍप क्रमांक प्रसारित करण्यात आला आहे. वाहनाच्या फोटोबरोबच रस्त्याचे नाव, अंदाजे किती दिवसांपासून वाहन रस्त्यावर उभे आहे, तसेच इतर माहिती असल्यास द्यावी. हिंजवडी वाहतूक विभागाच्या हद्दीत येणारे कस्पटे चौक ते वाकड चौक, मानकर चौक ते काळेवाडी फाटा चौक, काळेवीडी फाटा चौक ते डांगे चौक, डांगे चैक ते वाकडगाव चौक (दत्त मंदिर रोड), उत्कर्ष चौक ते छत्रपती शिवाजी चौक (वाकडगाव), डांगे चौक ते बिर्ला चौक, थेरगाव फाटा ते तापकीर चौक, डांगे चौक ते लंडन ब्रिज, डांगे चौक ते भुमकर चौक, चांदणी चौक ते किवळे ब्रिज (महामार्गाच्या दोन्ही बाजुस), भुमकर चौक ते शिवाजी चौक, मारुंजी वाय जंन्शन ते लक्ष्मी चौक, वाकड ब्रिज ते शिवाजी चौक, हिंजवडी व मान आयटी परिसरामधील फेज 1, फेज 2, फेज 3 याच रस्त्यांची माहिती द्यावी, असे आवाहन केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)