बेवारस तरुण पालकांच्या स्वाधीन

मंचर – मंचर परिसरात अंदाजे 20 ते 25 वयाचा बेवारस तरुण फिरत होता. त्याला मराठी भाषा समजत नसल्याने मंचर पोलिसांनी त्याच्या खिशातील चिठ्ठीच्या आधारे त्याच्या आई-वडिलांचा शोध घेवुन शुक्रवारी (दि.28) त्याला त्यांच्या स्वाधीन केले. त्यामुळे त्याच्या आई-वडिलांनी आनंद व्यक्त करीत मंचर पोलीस ठाणे आणि ग्रामस्थाचे आभार मानले.
मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंदाजे 20 ते 25 वयाचा बेवारस स्थितीत एक मुलगा फिरताना स्थानिक ग्रामस्थ अर्जुन थोरात आणि काळूराम गेनूभाऊ कौदरे यांना दिसून आला. त्यांनी सदर मुलास मंचर पोलीस ठाण्यात आणले. पोलिसांनी मुलाकडे चौकशी केली असता तो मनोरुग्ण होता आणि त्यास मराठी भाषा समजत नव्हती. त्यामुळे त्याच्या पालकांचा शोध घेणे अतिशय कठीण झाले होते. त्यानंतर सदर मुलाच्या अंगझडतीत खिशात एक चिठ्ठी मिळून आली. त्या चिठ्ठीवर त्याचे वडील पुतनूर काशी विश्वनाथ (रा. मंगला विधी सोमपेटा, जि. श्रीकाकोलाम, आंध्रप्रदेश) यांचा मोबाईल नंबर मिळून आला. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधून त्याचे आई-वडिलांना मंचर पोलीस ठाण्यात बोलावून घेवून चोकशी केली. त्यावेळी सदर मुलगा मनोरुग असून त्या मुलाचे नाव सत्याशिवा पुतनूर (वय 23) असल्याचे सांगितले. सदर मुलगा 22 सप्टेंबर रोजी घरातून बेपत्ता झाला होता. मुलास त्याच्या आई-वडिलांच्या ताब्यात सुखरुप देण्यात आल्याने त्यांनी आनंद व्यक्त करीत मंचर पोलीस ठाणे आणि ग्रामस्थाचे आभार मानले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)