बेळगाव : मराठी भाषिकांवर पोलिसांचा लाठीमार 

बेळगाव: कर्नाटकी प्रशासनाची मुस्कटदाबी झुगारून हजारो मराठी भाषिकांनी आज “काळा दिन’ फेरीत सहभाग घेतला. गोवा वेसजवळ मराठी भाषिकांचा मोठा घोळका असल्याने तणाव निर्माण झाला. यावेळी पोलिसांनी काही तरुणांवर लाठीमार करत त्यांना तेथून हाकलून लावले.

प्रशासनाने काळ्या दिनाच्या परवानगीसाठी रात्रभर चालढकल केली. प्रशासनाने दडपशाही केली तरीही आज सकाळी 9 वाजल्यापासून हजारो मराठी भाषिकांनी मूक फेरीत सहभागी होऊन पुन्हा एकदा महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार व्यक्‍त केला. काळे आणि भगवे ध्वज, घोषणा आणि युवा कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे मूक फेरी यशस्वी ठरली. निवडणुकीत हरलो तरी महाराष्ट्रात जाण्याचा निर्धार कमी झालेला नाही, असे मत फेरीदरम्यान व्यक्त करण्यात आला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

भाषावार प्रांतरचना करतेवेळी बेळगावसह सीमाभागावर झालेल्या अन्यायाविरोधात बेळगाव शहर आणि सीमाभागात कडकडीत हरताळ पाळून “काळा दिन’ पाळण्यात येतो. काळ्या दिनाच्या फेरीला परवानगी मिळू नये यासाठी कन्नड संघटना व प्रशासनाने बुधवारी रात्रभर चालढकल केली. मात्र मराठी नेत्यांच्या रेट्यामुळे प्रशासनाने गुरुवारी सकाळी 7 वाजता परवानगी दिली. या फेरीनंतर झालेल्या सभेमध्ये माजी आमदार मनोहर किनेकर, अध्यक्ष दीपक दळवी, शिवसेना कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे आदींनी मार्गदर्शन केले. महिन्याभरापासुन सोशल मीडियावरून मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्याने मूक फेरीला युवा वर्गाचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात मिळाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)