बेळगावात सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक

बेळगाव : सांबराच्या शिंगांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना शहर गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली आहे. दरम्यान, अटकेतील पाच जणांकडून सांबाराची शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. विशेष म्हणजे हे पाच जण हस्तिदंत आहेत, असे सांगून त्याची विक्री करत असल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाले, अशी माहिती पोलीस आयुक्त डी. सी.राजप्पा यांनी सांगितले.

बेळगुंदी येथील फार्म हाऊस मधून ही सांबाराची बारा किलो वजनाची शिंगे जप्त करण्यात आली आहेत. नागेश मादार, रामचंद्र दळवी, रवींद्र कोलकार, परशुराम निलजकर आणि अमन कणबर्गी अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. जंगलातील प्राण्यांची हत्या करून त्यांची शिंगे बेळगुंदी येथील फार्म हाऊसमध्ये साठवण्यात येत होती. नंतर त्याला पॉलिश करून हस्तिदंत असे सांगून दिशाभूल करून सांबरच्या शिंगांची विक्री करण्यात येत होती. यापूर्वी या पाच व्यक्तींनी कोठे शिंगांची विक्री केलेली आहे याचा तपासही पोलिसांकडून करण्यात येत आहे. पकडण्यात आलेल्या पाच जणांवर वन्यजीव संरक्षण कायद्या अंतर्गत ग्रामीण पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)