बेळगावात पोलीसपुत्राची फिल्मीस्टाईलने हत्या

कोल्हापूर : बेळगावात आपल्या मुलीच्या मृत्यूस कारणीभुत ठरलेल्या पोलिसपुत्रांची हत्या फिल्मी स्टाईलने झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. निप्पानी परिसरात घडलेल्या या घटनेचा तपास सांगली, कोल्हापूर आणि निप्पानी पोलिस संयुक्तरित्या करत आहेत. या प्रकरणी निप्पानी पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेता अजय देवगणचा दृश्यम चित्रपट आला होता. याच चित्रपटची कॉपी करता आरोपींनी आपल्या मुलीच्या मृत्यूचा बदला घेतला असल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, आरोपीचा गुन्हा लपवण्याची फिल्मी स्टाईल पोलिसांनी उधळून लावली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ येथील शब्बीर बोजगर पोलीस विभागात काम करतात. त्यांचा मुलगा शाहरुख बोजगरचा कर्नाटकातील हणबरवाडी इथे 11 जुलैला निर्घृण खून झाला.
शाहरुख याचे सांगलीतील एका युवतीशी प्रेमसंबंध होते. पण त्या मुलीचे लग्न झाल्याची बातमी शाहरुखला कळाली. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाले. त्यातून मुलीने सहा महिन्यापूर्वी आत्महत्या केली.
आपल्या मुलीने शाहरुखच्या भांडणाला कंटाळून आत्महत्या केल्याचा राग रवींद्र नगरकर यांना आला. त्यानंतर वडिलांनी आपली दोन मुए सुमीत आणि रोहितसह मिळून शाहरुखची हत्या करण्याचा प्लान केला. शाहरुखला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मुलीच्या एका भावाने सोशल मीडियावर फेक अकाऊंट उघडले. शाहरुखशी चॅटिंग सुरु केले. त्यातून मैत्रीचे संबंध वाढवले आणि हणबरवाडीला बोलावले. 11 जुलै रोजी बापलेकांनी एका साथीदारासह शाहरुखचा खून केला.
दरम्यान,आरोपी कितीही हुशार असो किंवा एखाद्या चित्रपटाची कॉपी करू देत पण एकतरी चूक करून पोलिसांच्या जाळ्यात नक्कीच अडकतो हे या प्रकरणावरून सिध्द झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)