बेल्ह्यातील विहिरी, कूपनलिकांची पातळी खालावली

संग्रहित छायाचित्र

पाझर तलाव आटले ः सरकारी विहीर गावाला जीवनदायी

अणे -जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात विहिरी व कूपनलिकांच्या पाण्याची पातळी खालावलेली आहे. सर्व बंधारे फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत. बेल्हे, राजुरी, मंगरूळ, पारगाव, साकोरी, औरंगपूर या भागात विहिरींची संख्या मोठी आहे.

या भागामध्ये पाटाला पाणी आले की विहिरी व कुपनलिकांची पाणी पातळी वाढते. पाटाचे पाणी बंद झाले की पातळी खालावते. अणे व पठारभागावर असणारे पाझर तलाव फेब्रुवारी महिन्यात आटले आहेत. नळावणे व शिंदे वाडीतील पाझर तलावात पाणी साठवून ठेवले आहे. शेतीला पाणी दिले जात नाही म्हणून आत्ता पर्यंत 40 ते 45 टक्‍के पाणी साठवून ठेवला आहे. या पाण्याचा उपयोग येथील पाळीव प्राणी व जंगली प्राण्यांना होतो. पुढील एक महिना पाणीसाठा पुरेल अशी ग्रामस्थांना आशा आहे.
अणे गावात असणारी सरकारी विहीर गावाला जीवनदायी ठरत आहे.गावातील बहुतेक लोक येथून पाणी नेतात. बहुतेक विहिरी आटल्या आहेत.अणे घाटात असणारा गूळंचेवाडीतील पाझर तलाव मागील महिन्यात कोरडा पडला आहे. चालू वर्षी चांगला पाऊस झाला तरी पाणीसाठा मार्चमधेच तळाला गेलेला दिसून येत आहे. त्यामुळे पठारभागावरील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)