बेल्ह्यातील मॉडर्न शाळेत फुलला भाजीबाजार

अणे- बेल्हे (ता. जुन्नर) येथील मॉडर्न इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी भाजीबाजार भरवला होता. या बाजारात विद्यार्थ्यांना पंचवीस हजार रुपयांच्या साहित्याची विक्री केली. पहिली ते दहावीच्या विद्यार्थांनी या बाजारात विविध प्रकारचे साहित्य विक्रीसाठी ठेवले होते. सर्व प्रकारच्या पालेभाज्या यात शेपू, पालक, मेथी, अळूची पाने, माठ, करडई, तांदूळ, कोथिंबीर यांचा समावेश होता, तर फळभाज्यांमध्ये भेंडी, शेवगा, गवार, वाल, कारली, वांगे, भोपळा, कोबी, टोमॅटो, बटाटा, फ्लावर, वाटाणा, फळे विक्रीस ठेवण्यात आली होती. याचबरोबर खाद्य पदार्थांमध्ये पॅटिस, सॅंडविच, नूडल्स, भेळ, दाबेली, पेढे, चिक्की याबरोबरच किराणा साहित्य, कडधान्य, शैक्षणिक साहित्य, स्टेशनरी साहित्य विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांना सामाजिक आणि व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी या बाजारा कार्यानुभावाचे आयोजन करण्यात आले होते. या बाजारात संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ शिंदे, विश्‍वस्त दावला कणसे, प्राचार्या विद्या गाडगे, उपप्राचार्य के. पी. सिंग, शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)