बेल्हेच्या थेट सरपंचपदी राजाभाऊ गुंजाळ

बेल्हे-जुन्नर तालुक्‍यात महत्त्वाची समजल्या जाणाऱ्या बेल्हे ग्रामपंचायतीच्या तिजोरीच्या चाव्या ग्रामस्थांनी राजाभाऊ गुंजाळ यांच्या हाती दिल्या.
या निवडणुकीत सरपंचपदी राजाभाऊ गुंजाळ यांच्या श्री मुक्ताई ग्रामविकास पॅनेलने 17 पैकी 9 जागा जिंकून आपले वर्चस्व राखले. तसेच थेट सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत इतर 5 उमेदवारांना चित करत राजाभाऊ गुंजाळ 477 मतांनी निवडून आले.
राजाभाऊचा राजकीय वाटचालीचा प्रवास प्रथमतः जिल्हा परिषद सदस्य नंतर, पंचायत समिती सदस्य व सभापती आणि आता थेट जनतेतून सरपंचपदी निवड असा आहे. बेल्हे ग्रामपंचायतीच्या 6732 मतदारांपैकी 5332 मतदारांनी आपला हक्क बजावला. त्यापैकी थेट सरपंचपदासाठी राजाभाऊ गुंजाळ यांना 2419 तर प्रदीप पिंगट यांना 1942 मते मिळाली. संपूर्ण तालुक्‍यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दरम्यान तांबेवाडी येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी तान्हाजी सिताराम कुंजीर हे विजयी झाले. तसेच गुंजाळवाडी येथील ग्रामपंचायतीच्या निवडणूकीत लहू भिमाजी गुंजाळ यांचे संपूर्ण पॅनल निवडून आले असून थेट सरपंचपदासाठी किसन बोरचटे यांना 525 मते तर लहू गुंजाळ यांना 821 मते पडून 296 मतांनी सरपंचपदावर निवडून आले. या तीनही ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अनुक्रमे के. डी. भुजबळ, के. बी. खोडदे व डी. एन. राठोड यांनी काम पाहिले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)