बेलापूर येथे ग्रा. प. सदस्यावर बिबट्यचा हल्ला

पिंजरा लावण्याची ग्रामस्थांची मागणी
राहूरी – संक्रापूर (ता.राहुरी) येथील महीलेवर ऊक्कलगाव शिवारात हल्ला झाला असल्याची घटना ताजी असतानाच बेलापूरातही बिबट्याने एकावर हल्ला करुन जखमी केले असुन त्यास उपचारा करीता अहमदनगर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, बेलापूर कुर्हे वस्ती (टिळकनगर परिसर) या ठिकाणी राहत असलेले बेलापूर ग्रामपंचायतीचे सदस्य सुनिल केदारनाथ कुर्हे हे आपल्या गट नबंर 119 मधील शेतात बारे बदलण्यासाठी गेले असता शेजारील अर्जुन कुर्हे यांच्या शेतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढविला. बिबट्याने पायाला पकडले असता सुनिल कुर्हे यांनी आरडाओरडा केला तसेच कशी बशी बिबट्याच्या तावडीतून सुटका करुन शेजारील बोरावके वस्तीवर धाव घेतली. त्याना ग्रामस्थांनी तातडीने बेलापूर येथील प्राथमिक आरोग्य केद्र येथे उपचारासाठी आणण्यात आले. त्यांच्या पायाला चार दात लागले असून जखम खोलवर गेलेली आहे या बाबत बेलापूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. सोनटक्के यांनी त्यांचेवर उपचार करुन लस उपलब्ध नसल्यामुळे नगरला जाण्याचा सल्ला दिला. यानुसार सुनिल कुर्हे यांना तात्काळ नगरला हलविण्यात आले. त्यांच्या एका पायाला चार दात लागले असुन दुसर्ऱ्या पायाला पंजाचे वरखडे लागले आहे. यापरिसरात बिबट्याचा वावर वाढला असुन वनविभागाने तातडीने पिंजरा लावण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)