बेलापूर बुद्रुक गटातील कामांच्या चौकशीची मागणी

आठ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा ससाणे गटाचा आरोप
नगर – श्रीरामपूर तालुक्‍यातील बेलापुर येथे बनावट कागदपत्र तयार करुन संगमनमाताने सुमारे 8 लाख रुपये शासनाचे नुकसान केल्याच्या निषेधार्थ तसेच या कामांची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी ससाणे गटाच्यावतीने जिल्हा परिषदेसमोर उपोषण करण्यात आले.
बेलापुर जिल्हा परिषद गटातील सन 2014-15 सालात तिर्थक्षेत्र विकास निधी जिल्हा परिषद सेस या योजनतुन विरोबा मंदीर बांधले व मारुत मंदीर, समाज मंदिर बांधले अशी कामे जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व उपअभियंता खाजेकर, अभियंता विलास जगधने यांनी संगनमताने कागदपत्रे तयार करुन सुमारे 8 लाख शासनाने नुकसान केले असुन ही जागा खाजगी मालकीची असुन त्या जागेचा सातबारा उतारा ग्रामपंचायत नमुदा नं.8 वर वडीलोपार्जित असून पैसे हडक करण्यासाठी ग्रामपंचायत नमुना नं.8 ही बाहेरची बनावट तयार करुन ग्रामपंचायत जागेवर काम दाखवुन सदर काम हे वर्गणी जमा करुन झालेले आहे.
काम करते वेळी ग्रामपंचायतला अंधारात ठेवुन बनावट कागदपत्र केली.गोखलेवाडी येथील मारुती मंदिर शेतीमहामंडळ मालकीच्या जागेत बांधकाम केले असुन परवागनी घेतलेली नाही, अशी तक्रार नवले यांनी आपले सरकारवर दि.8 फेब्रूवारी रोजी केली होती. त्या चौकशीचा अहवाल उपअभियंता यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे केले असून त्यांना तक्रारदाराच्या अर्जावर तथ्थ आहे. परंतु राजकीय दबावासाठी अधिकाऱ्यांना जाणीवपूर्व कारवाई करण्याचे टाळत आहे. या अभियंता, उपअभियंता व जिल्हा परिषद सदस्य यांची बनावट कागदपत्रे केलेले असल्याचे सिध्द झाले त्यावर कारवाई होत नाही. त्यामुळे हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समिती सदस्य वंदना मुरकुटे, सचिन गुजर, सुरेश वाघ, ज्ञानदेव साबळे, संगीता शिंदे, किरण भांड आदी सहभागी झाले होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)