बेलवंडीत इमारतीत आग, महिला होरपळून ठार

श्रीगोंदा – तालुक्‍यातील बेलवंडी येथील किराणा व्यापारी ईश्‍वर कोठारी यांच्या इमारतीत शॉर्टसर्कीटमुळेआग लागली. या आगीत संगीता ईश्‍वर कोठारी (वय 48) ही महिला जागीच ठार झाली. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली.

ईश्‍वर कोठारी यांची विठ्ठल मंदिराजवळ तीन मजली इमारत आहे. खालच्या मजल्यावर किराणा दुकान आहे. दुसऱ्या मजल्यावर ते राहतात. तिसऱ्या मजल्यावर एक आराम खोली आहे. संगीता कोठारी ह्या आराम करण्यासाठी तिसऱ्या मजल्यावरील खोलीत गेल्या होत्या. विजेचे शॉर्टसर्कीट झाले. या आगीत होरपळून संगीता कोठारी यांचा मृत्यू झाला. आग लागली त्यावेळी ईश्‍वर कोठारी व त्यांचा मुलगा संकेत किराणा दुकानात होते. बेलवंडीतील युवकांनी धुराचा लोट चालू असताना दुर्घटना ग्रस्त खोलीत प्रवेश केला. पण तोपर्यंत संगीता यांचा होरपळून मृत्यू झाला होता. पोलीस शिपाईसाबळे यांनी घटनास्थळास भेट देऊन पंचनामा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)