बेलपिंपळगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त आजपासून हरिनाम सप्ताह

संग्रहित छायाचित्र

बेलपिंपळगाव – नेवासा तालुक्‍यातील बेलपिंपळगाव येथे हनुमान जयंतीनिमित्त भास्करगिरी महाराज यांच्या प्रेरणेने व सेवानंद महाराज, साहेबराव महाराज कांगुणे, रामनाथ महाराज पवार, संजय महाराज सरोदे व दत्तात्रेय महाराज तऱ्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह आयोजन करण्यात आले आहे. शनिवारपासून (दि. 24) हा सोहळा शनिवारपर्यंत (दि. 31) साजरा होणार आहे. दररोज पहाटे काकडा भजन व आरती होईल. सकाळी ग्रंथराज ज्ञानेश्‍वरी पारायण, सायंकाळी हरिपाठ होईल. रात्री रामायणाचार्य हरेराम महाराज शास्त्री हे हनुमान चरित्रकथा निरूपण करणार आहेत. हनुमान जयंती दिवशी काल्याचे कीर्तन साहेबराव महाराज कांगुणे यांचे होईल. यानंतर महाप्रसाद वाटप होणार आहे. तरी गावातील व पंचक्रोशीतील भाविकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री हनुमान मंदिर देवस्थान व ग्रामस्थांनी केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)