बेलदार भटका समाज संघाच्या जिल्हाध्यक्षपदी महेश मोहिते

वडगाव मावळ, (वार्ताहर) – येथील युवा सामाजिक कार्यकर्ते महेश अर्जुन मोहिते यांची बेलदार भटका समाज संघाच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली.

देहू येथे रविवारी (दि. 25) रोजी बेलदार भटका समाज संघाच्या जाहीर मेळाव्या प्रसंगी युवा सामाजिक कार्यकर्ते महेश मोहिते यांच्या समाजोपयोगी कार्याची तसेच कार्यक्षम नेतृत्वाची दखल घेऊन बेलदार भटका समाज संघाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष रमेश जाधव, महिला अध्यक्ष मैनाबाई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्य सरचिटणीस सुखदेव मोहिते व कायदेशीर सल्लागार ऍड. नवनाथ पवार यांच्या हस्ते महेश मोहिते यांना पुणे जिल्हाध्यक्ष पदाचे नियुक्ती पत्र देण्यात आला.

या वेळी दिलीप जाधव, सुनील मोहिते व बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. महेश मोहिते यांच्या निवडीबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराप्रसंगी महेश मोहिते पुणे जिल्ह्यातील बेलदार भटका समाजाचे मजबूत संघटन करुन त्यांचे सामाजिक जीवनमान उंचावण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या वैयक्तिक व सार्वजनिक योजना मिळवून देण्यासाठी पुढाकार घेणार.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)