बेरोजगारी व शेतकरी समस्यांवर मोदी गप्प का?

राहुल गांधी यांचा सवाल
ठाणे – देशातील वाढती बेरोजगारी आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काहीच का बोलत नाहीत असा सवाल कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. आज एका खटल्यासाठी ते भिवंडीच्या कोर्टात आले होते त्यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.

ते म्हणाले की आमची लढाई ही पंतप्रधानांच्या धोरणाच्या विरोधात आहे. आज शेतकरी नैराशाच्या गर्तेत गेला आहे. पण त्यांच्या विषयी किंवा वाढत्या बेरोजगारीविषयी ते काहीच बोलताना दिसत नाहीत. हे सरकार केवळ श्रीमंतांसाठीच काम करताना दिसत आहे. पंतप्रधानांनी काम की बात केली पाहिजे त्याऐवजी ते फक्त त्यांच्या मन की बात करीत आहेत. संघ किंवा भाजपने आपल्या विरोधात कितीही खटले दाखल करू देत पण आमची तत्वाची लढाई सुरूच राहील. या लढाईत आम्हीच जिंकू असे ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)